<br><em>आ. सुलभाताई खोडके यांची  जिल्हाधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा</em> .<br><em>खनिज विकास निधीतून होणार इर्विन चौक ते बियाणी चौक पर्यंत रस्ता काँक्रिटीकरण</em> .


आ. सुलभाताई खोडके यांची जिल्हाधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा .
खनिज विकास निधीतून होणार इर्विन चौक ते बियाणी चौक पर्यंत रस्ता काँक्रिटीकरण .

अमरावती ६ फेब्रुवारी : शहरातील नागरिकांना सुरक्षित वाहतूक व अपघात विरहित अवागमनाची सुविधा व्हावी म्हणून आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी रस्ते विकासाचा सपाटा सुरू केला आहे. त्यामुळे मागील वर्षभरापासून अमरावती शहरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्ते तसेच शहरातून जाणारे राज्य मार्ग व जिल्हामार्ग देखील दर्जेदार काँक्रीटीकरणाने कात टाकत आहे. रस्त्यांना नवी चकाकी आल्याने शहराच्या सौदर्यात भर पडली आहे. मात्र शहरातील इर्विन चौक ते बियाणी चौक या अत्यंत वर्दळीच्या व सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी एक पर्याय असलेल्या रस्ताच्या काँक्रीटीकरणा घेऊन काही अडचणी निर्माण झाल्या आहेत . या संदर्भात सर्व बाबींवर गांभीर्याने विचार करून आ. सुलभाताई खोडके यांनी इर्विन चौक ते बियाणी चौक पर्यंतच्या रस्त्याकरिता निधी उपलब्धीला घेऊन पर्याय शोधला आहे . सदर रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी खनिज विकास निधी अंतर्गत निधी उपलब्ध करण्यात यावा,अशी मागणी आ. सुलभाताई खोडके यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना पत्राद्वारे केली आहे. यावेळी आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करतांना सांगितले की, इर्विन चौक ते बियाणी चौक रस्ता हा अत्यंत वर्दळीचा असून या रस्त्यावरून सर्वच प्रकारची वाहतूक दिसून येते . या मार्गावर शाळा – महाविद्यालय , लोकवसाहती तसेच मुख्यत्वे या मार्गावर शासकीय कार्यालय आहेत . त्यामुळे या मार्गावरून बहुतांश विद्यार्थी , शासकीय कर्मचारी तसेच कार्यालयीन कामकाजासाठी जाणाऱ्या अभ्यागत नागरिकांची अवागमन दररोज मोठ्या प्रमाणात दिसून येते . तसेच पुढे हा रस्ता विद्यापीठा पर्यंत व त्यापुढे आसपासच्या गावांपर्यंत जोडल्या गेल्याने ग्रामीण भागातून शहरांकडे येणाऱ्या नागरिकांना सुद्धा याच मार्गाचा अवलंब करावा लागतो .अश्या बहूपर्यायी मार्गाची दुरावस्था झाली आहे . या मागार्वर जागोजागी खड्डे पडले असल्याने अवागमान करण्यास अडचणी होत आहे . तसेच संपूर्ण शहरात काँक्रीट रस्त्याचे जाळे निर्माण होऊन नागरिकांना सुरक्षित वाहतुकीची सोय होत असतांना , मात्र इर्विन चौक ते बियाणी चौक पर्यंतचा रस्ता दुर्लक्षित राहत आहे . त्यामुळे या रस्त्याची सुधारणा करण्याला घेऊन आ. सौ सुलभाताई खोडके यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना पत्र देऊन चर्चा केली . इर्विन चौक ते बियाणी चौक हा रस्ता महानगर पालिकेच्या अखत्यारीत येत असल्यामुळे व शासनाच्या इतर कोणत्याही योजनेमध्ये याचा समावेश करता येत नसल्याने खनिज विकास निधी अंतर्गत या रस्त्याची दुरुस्ती करण्याकरिता निधी उपलब्ध करून देण्यात यावा ,अशी मागणी आ. सुलभाताई खोडके यांनी जिल्हाधिकाऱ्यांना चर्चे दरम्यान केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा याबाबत सकारात्मकता दर्शविली असून लवकरच या संदर्भात संबंधितांना निर्देश देऊ,व कार्यवाही गतीने पुर्ण करणार असल्याबाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आमदार महोदयांशी संवाद साधला. जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चे दरम्यान सांगितले की , इर्विन चौक ते बियाणी चौक पर्यंतचा रस्ता हा गौण खनिज विकास निधी अंतर्गत येत असून यासाठी अंदाजे १२ कोटी रुपयांचा खर्च येतो . ज्या मध्ये पाच कोटीच्या खर्चातून मुख्य रस्ता व उर्वरित निधीतून फुटपाथ व ड्रेन चे काम करण्याचे नियोजन असते . त्यामुळे सदर कामाकरिता टप्याटप्याने निधी उपलब्ध करून देऊ, असा सकारात्मक विश्वास जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी यावेळी दर्शविला . इर्विन चौक ते बियाणी चौक पर्यंतच्या बहूप्रतिक्षित रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी निधि उपलब्धीचा पर्याय मिळाल्याने आता या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचा विषय मार्गी लागणार आहे. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता -एस.पी. थोटांगे, उपविभाग क्रमांक २ चे सहायक अभियंता श्रेणी १ एन. आर. देशमुख , यश खोडके आदी उपस्थित होते .

Leave a Reply