विदर्भ महाविद्यालयात संशोधन केंद्र व विज्ञान भवनासाठी कटिबद्ध*
संस्थेतील शैक्षणिक सुविधा व पायाभूत सेवांचा आ. सुलभाताई खोडके यांनी घेतला आढावा
ऐतिहासिक वास्तूचे जतन व शैक्षणिक विकासासाठी शासन स्तरावर प्रयत्नरत

अमरावती ६ फेब्रुवारी : विदर्भातील शिक्षणाचे माहेरघर असलेल्या अमरावती मध्ये जुने विदर्भ महाविद्यालय व सदयाचे शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था हे विदर्भातील एकमेव शासकीय महाविद्यालय आहे. आपल्या शतकपूर्तीकडे वाटचाल करणाऱ्या या विदर्भातील ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्याबरोबरच येथे अदयावत शैक्षणिक सुविधा व पायाभूत विकासाला आपले प्राधान्य असून संस्थेला स्वायत्त दर्जा मिळण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचा विश्वास आ.सुलभाताई खोडके यांनी व्यक्त केला .
कठोरा नाका स्थित शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था अमरावती मधील शैक्षणिक सोयी-सुविधा तसेच पायाभूत सुविधा व आवश्यक असलेल्या नवीन अद्ययावत सुविधांबाबतच्या आढावा सभे दरम्यान त्या बोलत होत्या.यावेळी आयोजित सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके, संस्थेचे संचालक डॉ. वसंत हेलावी रेड्डी, आयक्युएसी समन्वयक डॉ. सतिश माळोदे , क्रिडा विभाग प्रमुख डॉ. विशाखा सावजी, डॉ शिवानंद कुमार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनिल थोटांगे, आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. पुढे बोलतांना आ. सुलभाताई खोडके यांनी सांगितले की, व्हीएमव्ही हे अमरावतीचे शैक्षणिक वैभव असून संस्थेत अनेक विद्याशाखा व अद्यावत शिक्षणाची सोय असल्याने केवळ अमरावतीच नव्हे तर विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात . त्यामुळे या संस्थेत आणखीन उच्च शिक्षणाच्या संधी व नावीन्यपूर्ण शिक्षणाचे विविध अभ्यासक्रम सुरू होणे ही आजची गरज आहे . आगामी काळाची गरज लक्षात घेता संस्थेमध्ये संशोधन केंद्र , विज्ञान भवन उपलब्धीसह संस्थेतील एमएसस्सी च्या जागा 20 हून चाळीस होणे गरजेचे आहे . तसेच या सोबतच संस्थेत वाणिज्य शाखा अभ्यासक्रम सुरू करण्याच्या प्रस्तावाला घेऊन आपण शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आ. सुलभाताई खोडके यांनी सांगितले. तसेच स्थानीय परिसरात भौतिक शैक्षणिक सुविधांची सुद्धा गरज भासणार आहे . त्यामुळे या सर्व बाबींना घेऊन संस्थेने तसा प्रस्ताव सादर केल्यास आपण शासनाकडे पाठपुरावा करून व्हिएमव्हीला भविष्यात स्वायतत्ता प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार महोदयांनी यावेळी सांगीतले . व्हिएमव्ही या ऐतिहासिक वास्तूचे जतन व्हावे व इमारत अधिक प्रशस्त व्हावी यासाठी विदर्भ महाविद्यालयाचे स्ट्रक्चर ऑडिट करा अशी सूचना देखील आ. सुलभाताई खोडके यांनी केली . दरम्यान आपल्या प्रस्ताविकमध्ये संस्थेचे संचालक डॉ. वसंत हेलावी रेड्डी यांनी संस्थेचा संपूर्ण आढावा देतांना संस्थेच्या उपलब्धी बाबत उपस्थितांना अवगत केले . तसेच संस्थेत शतकपूर्ती भवन, इनोव्हेशन व इन्क्युबिशन सेंटर, आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रीडांगणे, आंतरराष्ट्रीय दर्जाचे ग्रंथालय, कनिष्ठ महाविद्यालयासाठी स्वतंत्र इमारतीची मागणी केली. त्याच प्रमाणे कॉमर्स विषय सुरू करण्याबाबत प्रस्ताव विद्यापीठाकडे सादर केला असून मुंबईच्या अभ्यासक्रमा प्रमाणे रोजगारक्षम असा अभ्यासक्रम सुरू करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू असल्याचे संचालकांनी सांगीतले . यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके यांनी देखील आपल्या संबोधनात व्हिएमव्ही च्या विस्तीर्ण परिसरात शैक्षणिक व क्रीडा विषयक सुविधा निर्माण करणे शक्य असल्याचे सांगितले. संस्था परिसरात आंतराष्ट्रीय दर्जाचे ग्रंथालय,अत्याधुनिक सुविधायुक्त स्पोर्टयार्ड,इनडोर स्टेडीयम,रनिंग ट्रॅक, असावे यावर संजय खोडके यांनी भर दिला .तसा प्रस्ताव संस्थेने सादर करावा अशी सूचना संजय खोडके यांनी केली. तर डॉ. सतिश माळोदे यांनी संस्थेतील काही वास्तूंच्या नुतनीकरणाचा व निर्माणाधीन वास्तूंचा प्रस्ताव सादर केला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील थोटांगे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेल्या संस्थेतील बांधकामांचे व नुतनीकरण प्रस्तावाची सद्यस्थितीचे सभेत वर्णन केले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता विनोद बोरसे, शाखा अभियंता एन. प्रकाश रेड्डी, संस्थेतील डॉ. अंजली देशमुख, डॉ.श्रीकृष्ण यावले, डॉ. किशोर पाटील, डॉ. संतोष चव्हाण, डॉ. जयंत चौधरी, डॉ.पुर्णिमा दिवसे, डॉ. रामकृष्ण घायगुडे, डॉ. प्रतिभा भोरजार, डॉ.विनोद गावंडे , डॉ. सुनील इंगळे, डॉ.मिलिंद काळे, डॉ. मुरलीधर वाडेकर, डॉ. सुबोध भांडारकर, डॉ. शफीक खान , डॉ. शिला चाफले, डॉ.उमेश जगताप, डॉ.किशोरसिंह चुगंडे, डॉ . विशाखा सावजी , डॉ.वैभव ठाकरे, डॉ. किरणकुमार बोंदर, डॉ. शकील पठाण , डॉ. ओमकुमार टोंपे, डॉ. सिराज अन्वर , तसेच माजी महापौर विलास इंगोले, ऍड.किशोर शेळके , माजी स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर , मनपा विरोधी पक्ष नेता बबलू शेखावत, राजेंद्र महल्ले, यश खोडके, जितू ठाकूर, रतन डेंदुले, दिलीप कडू, भोजराज काळे, प्रमोद महल्ले, सुयोग तायडे,प्रशांत पेठे , आकाश वडनेरकर, दत्तात्रय बागल, ऍड .सुनील बोळे, अशोक हजारे,गुड्डू धर्माळे ,नितीन भेताळू, गजानन बरडे, भूषण बनसोड, किशोर भुयार, किशोर देशमुख, दिनेश देशमुख. शुभम पारोदे, आदीसह कार्यकर्ते व कर्मचारी प्राध्यापक वृंद व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply